परिचारिका नेहा पालव यांचा विविध संघटना कडून सन्मान

*💫सावंतवाडी दि.२८-:* मुंबई महापालिका प्रशासनात शताब्दी हाॅस्पिटल गोवंडी मुंबई येथे ओरोग्य परिचारीका पदावर कार्यरत असलेल्या सौ नेहा नारायण पालव यांना म्युनिसिपल नर्सिंग अँन्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियन मुंबई तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आदी संघटनांकडून सन्मानित करण्यात आले आहे. सौ नेहा नारायण पालव या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली,घोलेवाडी येथील रहिवासी रहिवासी असून सध्यस्थित नवीमुंबई येथे कामानिमित्त राहत…

Read More

मालवण-आडारी डम्पिंग ग्राउंडला पुन्हा आग….

मध्यरात्री कणकवली नगरपंचायत अग्निशमन आल्यावर आगीवर नियंत्रण;आग लावली जात असल्याचा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा आरोप ; चौकशीची मागणी *💫मालवण दि.२८-:* नगरपालिकेच्या आडारी डंपिंग ग्राउंड येथे रविवारी रात्री पुन्हा एकदा आग लागली. डम्पिंग ग्राऊंड येथे महिनाभरातील ही आगीची दुसरी घटना आहे.येथील कचऱ्याला लागलेली आग वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर अधिकच भडकत होती. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट परिसरात…

Read More

ब्राह्मण मंडळाच्या दिनदर्शिकेचे राजाराम चिपळुणकर यांच्या हस्ते प्रकाशन

*💫वेंगुर्ला दि.२७-:* वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सिधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजाराम चिपळुणकर यांच्या हस्ते करण्यात आले. सिधुदुर्ग ब्राह्मण मंडळ शाखा वेंगुर्ल्याची सभा येथील साई मंगल डिलक्स हॉल येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अरुण गोगटे, तालुका अध्यक्ष श्रीकांत रानडे, उपाध्यक्ष विद्या नवाथे, खजिनदार श्रीकृष्ण ओगले, कार्यवाह नित्यानंद आठलेकर, सहकार्यवाह जगदीश गोडबोले, सल्लागार चंद्रकांत फाटक,…

Read More

जिल्हा निवड चाचणी शुटिंगबॉल स्पर्धेत आजगाव संघ अजिंक्य

*💫मालवण दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंगबॉल असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शुटिंगबॉल असोसिएशन आणि जिल्हा शुटिंगबॉल विकास कमिटी आयोजित व कॉ. ए. बी. वर्धन स्मरणार्थ, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत जिल्हा शुटिंगबॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत आजगाव (अ) संघाने तरळे (अ) संघाचा १६-१० अशा गुणाने पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. सावंतवाडी येथील आर. पी. डी. हायस्कुलच्या मैदानावर…

Read More

एकुमखी दत्तमंदिरात विविध कार्यक्रम

वेंगुर्ला- वेंगुर्ला-कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात २१ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे. २८ डिसेंबरपर्यंत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.२७ रोजी रात्रौ ७ वा. पालखी, ७.३० वा. रामेश्वर दशावतार मंडळाचे नाटक, २९ रोजी पहाटे काकड आरती, रात्रौ १० वा. दत्तजन्म, त्यानंतर पालखी प्रदक्षिणा, ३० रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद. सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन…

Read More

वाढदिवसाच्या निमित्ताने जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

*💫वेंगुर्ला दि२७-:* जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कोकण इतिहास परिषदचे सदस्य डॉ. संजीव लिंगवत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले महाजनवाडी येथील पंधरा गरीब कुटुंबीयांना जीवनाश्यक वस्तू वितरित करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे सदस्य राजेश खोब्रेकर,सुभाष कदम,भगवान कदम,सिध्देश सावंत,अशोक गोसावी,गणु कदम आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

वायरी- तारकर्ली रस्त्यावरील खड्ड्यात बसून आमरण उपोषण छेडणार – सुरेश बापर्डेकर

*💫मालवण दि.२७-:* वायरी ते तारकर्ली रस्त्याच्या रुंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरण करण्याच्या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी आमरण उपोषण आंदोलन छेडल्यावर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी देऊनही अद्याप काम सुरू न झाल्याने चुकीचे आश्वासन देऊन दिशाभूल केल्याचा आरोप सुरेश बापर्डेकर यांनी केला आहे. तारकर्ली रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात…

Read More

वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन उद्या

*💫वेंगुर्ला दि.२७-:* जनसुविधा योजना व १४ वा वित्त आयोग अंतर्गत बांधण्यात आलेल्या तालुक्यातील वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास आमदार दिपक केसरकर, जि.प.अध्यक्ष समिधा नाईक,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर,मु.का.अधिकारी हेमंत वसेकर, पं. स.सभापती अनुश्री कांबळी,जि.प.सदस्य नितीन शिरोडकर,पं….

Read More

माजी मुख्यमंत्री – खासदार नारायण राणे उद्या चिपी विमानतळाला देणार भेट

*💫वेंगुर्ला दि.२७-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते आणि विद्यमान खासदार नारायण राणे सोमवार २८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट देणार आहेत. या भेटीमध्ये ते विमानतळाच्या कामाचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन विमानतळाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी दिली. वेंगुर्ले तालुक्यातील वजराट…

Read More

निवती रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ उपोषणाच्या पवित्र्यात!

*💫मालवण दि.२७-:* निवती रस्त्याच्या उर्वरित कामास सुरुवात न केल्यास २९ डिसेंबर पासून कुडाळ येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवती ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. म्हापण ते निवती या रस्ता कामाला २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आल्यानंतर जेमतेम दोन महिने काम केल्यावर पावसाळा सुरु झाल्यामुळे काम बंद करण्यात आले. पावसाळा संपल्यावर हे काम…

Read More
You cannot copy content of this page