*💫मालवण दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंगबॉल असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शुटिंगबॉल असोसिएशन आणि जिल्हा शुटिंगबॉल विकास कमिटी आयोजित व कॉ. ए. बी. वर्धन स्मरणार्थ, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत जिल्हा शुटिंगबॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत आजगाव (अ) संघाने तरळे (अ) संघाचा १६-१० अशा गुणाने पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. सावंतवाडी येथील आर. पी. डी. हायस्कुलच्या मैदानावर सिंधुदुर्ग जिल्हा सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय शुटिंगबॉल खेळाडू मोहन पेडणेकर यांच्या निरीक्षणाखाली हि स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उदघाटन कॉ. पी.सी. नेरुरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र सेल पेन्शनर, श्री रानडे यांच्या हस्ते झाले. उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर कॉ. पी.सी. नेरुरकर, श्री रानडे आंतर राष्ट्रीय शुटिंगबॉल खेळाडू – मोहन पेडणेकर, राष्ट्रीय पंच – देविदास कोलगावकर, शुटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजा देसाई, सचिव – प्रमोद मोहिते, डायरेक्ट शुटिंगबॉल असोसिएशन चे सचिव सुरेंद्र सपकाळ, जेष्ठ खेळाडू एकनाथ केसरकर , दिनेश पवार, बाबला कुडाळकर, भाऊ मिशाळ इ. मान्यवर उपस्थित होते. या निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील २१ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना हा अटीतटीचा आणि चुरशीचा होऊन आजगाव (अ) संघाने तरळे (अ) संघाचा १६-१० अशा गुणाने पराभव करत सिंधुदुर्ग जिल्हा चाचणी अजिंक्यपद पटकाविले. स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या आजगाव (अ) संघास ५ हजार रुपये पारितोषिक तर द्वितीय क्रमांक विजेत्या तरळे (अ) संघास ४ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले तसेच तृतीय क्रमांक विजेत्या संघास आजगाव (ब) ३ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक – मातोंड संघास २ हजार रुपये, आणि माणगाव , सातेरी बाव, वेताळ बांबर्डे, नांदगाव या संघांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे पारितोषिके देण्यात आले. यावेळी माजी शुटिंगबॉल खेळाडू आणि वेंगुर्ला नगरपालिका विद्यमान नगराध्यक्ष दिलीप गिरप,श्री गवस – माजी उपाअधीक्षक पोलीस खाते व पासिंग व्हॉलीबॉल खेळाडू, राजन आंगणे – उद्योजक सावंतवाडी, सावंतवाडी पोलीस इन्स्पेक्टर यांनी शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री दिनेश पवार , श्री. राजा देसाई, अध्यक्ष शुटिंगबॉल असोसिएशन सिंधुदुर्ग, प्रमोद मोहिते, सचिव शुटिंगबॉल अससोसिएशन सिंधुदुर्ग, सुरेंद्र सपकाळ सचिव डायरेक्ट शुटिंगबॉल असोसिएशन सिंधुदुर्ग, जेष्ठ शुटिंगबॉल खेळाडू व खेळाडू एकत्रीकरण समिती सदस्य एकनाथ केसरकर, बबल कुडाळकर, किरण शिंदे, योगेश गावडे आणि वीज मंडळ युनियन चे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतलेत. स्पर्धेत पंच म्हणून सुरेश पाटील, देविदास कोलगावकर, दिनेश पवार यांनी काम पहिले. गुणलेखक म्हणून श्रीकांत जो ईल, संजय कुडाळकर, राजन सावंत आणि रेषा पंच म्हणून विलास कुबल, विकास बागायतकर काम पहिले.
जिल्हा निवड चाचणी शुटिंगबॉल स्पर्धेत आजगाव संघ अजिंक्य
