पोलीस उपनिरीक्षक अवधूत बनकर यांचा सत्कार

बॉम्ब शोधक प्रशिक्षणामध्ये राज्यात द्वितीय येण्याचा मिळवला मान *💫सिंधुदूगनगरी दि.२४-:* बॉम्ब शोध प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी मध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केऋल्याबद्दल बॉम्ब शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक अवधूत बनकर यांचा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे ,पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला राज्य गुप्तवार्ता पोलीस अकादमी पुणे यांच्या वतीने सर्व जिल्ह्यातील पोलीस…

Read More

ऍड. प्राजक्ता शिंदे यांच्यासह भाजपा आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यां राष्ट्रवादीत दाखल…

_राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली झाला प्रवेश *💫कणकवली दि.२४-:* तालुक्यातील प्रसिद्ध तरुण विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांच्यासह भाजपा आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.हा प्रवेश कार्यक्रम कलमठ येथे पार पडला. यावेळी…

Read More

तर मुख्यमंत्रीपदाच महत्व काय ?

मंत्रालयातील दस्तऐवज हेराफेरी प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टार्गेट;ट्विट करीत भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका मालवण (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्यानंतर फाईलमधील शेराच बदलल्याचा गंभीर प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खातेनिहाय चौकशी प्रकरणात समोर आल्याने यावरून भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. “मंत्रालयाच्या…

Read More

आजचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश हा शिवसेनेतून – संतोष उर्फ पप्पू पूजारे.

खोटी प्रतिष्ठा मिळवून सहानुभूतीचे राजकारण करू नये. *💫कणकवली दि.२४-:* आज राष्ट्रवादी पक्षात झालेला पक्ष प्रवेश हा शिवसेनेतून झालेला आहे.आज राष्ट्रवादी पक्षाने कणकवलीत घेतलेल्या पक्ष प्रवेशाशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नसून ऍड. प्राजक्ता शिंदे ह्या शिवसेना तालुका कायदा आघाडी पदावर नियुक्त होत्या.त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींचा भारतीय जनता पार्टीशी संबंधित नाही. राष्ट्रवादी पक्षाने उगाचच दिशाभूल…

Read More

तळवणेच्या राधिका घाट्ये हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड…

बांदा भाजपकडून सत्कार 💫बांदा दि.२४-:* भारतीय जनता युवा मोर्चा बांदा मंडळातर्फे तळवणे गावची कन्या राधिका घाटये हीची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य संदीप नेमळेकर, तालुका सचिव ज्ञानेश्वर सावंत, तालुका सरचिटणीस नारायण कांबळी, युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, तालुका…

Read More

कोकिसरे येथील दिघा तरुणांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड…

दोन्ही खेळाडूंनी आ. नितेश राणे यांच्या वतीने आर्थिक मदत सुपूर्द_ *💫वैभववाडी दि.२४-:* महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात कोकीसरे येथील ओमकार नेवरेकर व हृतिक बेळेकर या दोघांची निवड झाली आहे. आ.नितेश राणे यांच्यावतीने प्रत्येकी 10 हजार रुपये ची आर्थिक मदत देण्यात आली. येथील भाजपा कार्यालयात तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे यांच्या हस्ते आर्थिक मदत दोघा…

Read More

तिथवली येथे परप्रांतीय कामगाराचा ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू…

*💫वैभववाडी दि.२४-:* तिथवली येथील केसीसी क्रेशर वरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत असलेल्या घरी मृत्यू झाला. मयत झालेल्या कामगारांचे नाव ललवाप्रसाद भेलूप्रसाद केवट वय अंदाजे 50 वर्षे रा.मध्य प्रदेश,सध्या रा.तिथवली.ही घटना 24 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. तिथवली तालुका वैभववाडी येथे मुंबई – गोवा महामार्गाच्या कामासाठी दगडाची…

Read More

निसर्गाची शाळा २५ जानेवारी २०२१ रोजी आचरा गाव जवळील जामडुल बेटावर

मुलांना मिळणार निसर्ग निरीक्षणाचा आनंद लुटणार *💫मालवण दि.२४-:* जैव विविधता संपन्न भागात राहणाऱ्या गावातील मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसंस्था ची ओळख आणि निसर्ग भटकंतीमधून शिक्षण मिळावे या उद्देशाने कोकणी रानमाणूस निसर्ग पर्यटन तर्फे सोमवारी सकाळी आचरा जामडूल बेटावर निसर्ग शाळेचे आयोजन करण्यात आले आहे.याचा विद्यार्थी वर्गाने लाभ घेण्याचे आवाहन कपिल गुरव आणि रानमाणूस निसर्ग पर्यटन तर्फे…

Read More

कट्टा व आचरा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर….

*💫मालवण दि.२४-:* यूपीएससी, एमपीएससी व स्टाफ सिलेक्शन बोर्डच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे उत्तम बुद्धिमत्ता असूनसूध्दा केवळ योग्य मार्गदर्शनाअभावी स्पर्धा परीक्षांमधील यशाचे प्रमाण अत्यल्प दिसून येते. त्यामुळे मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यशस्वी व्हावे यासाठी श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्यूकेशनल फाऊंडेशन, मालवणच्या वतीने दि. २५ जानेवारी…

Read More

बांद्यात घरात शिरलेल्या नागराजाला जीवदान…

*💫बांदा दि.२४-:* बांदा शहरातील शिक्षक सुहास बांदेकर यांच्या घरात शिरलेल्या नागराजला सर्पमित्र कैलास सावंत व डुमा बांदेकर यांनी शिताफीने पकडून वाफोली धरण येथे नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. शनिवारी रात्री उशिरा बांदेकर यांच्या घरात भक्ष्याच्या शोधार्थ भलामोठा नाग सर्प शिरला. बांदेकर कुटुंबीयांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने घरातच बस्तान मांडले. सर्पमित्र कैलास सावंत…

Read More
You cannot copy content of this page