बांद्यात घरात शिरलेल्या नागराजाला जीवदान…

*💫बांदा दि.२४-:* बांदा शहरातील शिक्षक सुहास बांदेकर यांच्या घरात शिरलेल्या नागराजला सर्पमित्र कैलास सावंत व डुमा बांदेकर यांनी शिताफीने पकडून वाफोली धरण येथे नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. शनिवारी रात्री उशिरा बांदेकर यांच्या घरात भक्ष्याच्या शोधार्थ भलामोठा नाग सर्प शिरला. बांदेकर कुटुंबीयांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने घरातच बस्तान मांडले. सर्पमित्र कैलास सावंत व डुमा बांदेकर यांनी सर्पाला पकडून जीवदान दिले. यावेळी बाबलो धामापूरकर यांनी सर्प पकडण्यासाठी मदत केली.

You cannot copy content of this page