*💫मालवण दि.२४-:* यूपीएससी, एमपीएससी व स्टाफ सिलेक्शन बोर्डच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे उत्तम बुद्धिमत्ता असूनसूध्दा केवळ योग्य मार्गदर्शनाअभावी स्पर्धा परीक्षांमधील यशाचे प्रमाण अत्यल्प दिसून येते. त्यामुळे मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यशस्वी व्हावे यासाठी श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्यूकेशनल फाऊंडेशन, मालवणच्या वतीने दि. २५ जानेवारी रोजी कट्टा व आचरा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ओम साई मंगल कार्यालय, कट्टा येथे तर दुपारी ३ वाजता हाॅटेल डॅफोडील्स हाॅल, आचरा येथे होणार आहे. या शिबिराचे उद्घाटक म्हणून श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्यूकेशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास झाड तर प्रमुख उपस्थिती म्हणून निवृत्त विक्रीकर अधिकारी सुरेंद्र नारकर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विनायक बार्गे, शिया एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त उध्दव शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. शिबिरांमध्ये २५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. तरी पूर्व नोंदणी मोबा. क्र.९४०४३४४६०१ यावर करावी. येताना मास्क असणे आवश्यक आहे, तपासणी करुनच प्रवेश दिला जाईल. तरी विद्यार्थी-पालकांनी या शिबिरांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनकार्यकारी संचालक मंडळ, श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्यूकेशनल फाऊंडेशन यांनी केले आहे.
कट्टा व आचरा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर….
