निसर्गाची शाळा २५ जानेवारी २०२१ रोजी आचरा गाव जवळील जामडुल बेटावर

मुलांना मिळणार निसर्ग निरीक्षणाचा आनंद लुटणार

*💫मालवण दि.२४-:* जैव विविधता संपन्न भागात राहणाऱ्या गावातील मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसंस्था ची ओळख आणि निसर्ग भटकंतीमधून शिक्षण मिळावे या उद्देशाने कोकणी रानमाणूस निसर्ग पर्यटन तर्फे सोमवारी सकाळी आचरा जामडूल बेटावर निसर्ग शाळेचे आयोजन करण्यात आले आहे.याचा विद्यार्थी वर्गाने लाभ घेण्याचे आवाहन कपिल गुरव आणि रानमाणूस निसर्ग पर्यटन तर्फे करण्यात आले आहे. निसर्ग शाळा ह्या उपक्रमा अंतर्गत सह्याद्रीच्या जंगलापासून ते नद्या, खाडी, समुद्र, कांदळवन, सडे, इत्यादी परिसंस्था ची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यावर आधारित शाश्वत निसर्ग जीवन जगणाऱ्या लोकांची जीवनशैली, कला, कौशल्ये त्यांनी आत्मसात करावे या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. या निसर्गाच्या शाळेतून शाश्वत मासेमारी वर आधारित जीवनशैली आणि समुद्रालगतची जैविविधता या बद्दलही माहिती दिली जाणार आहे. कांदळवनची सफर, आजूबाजूच्या जंगलातील भटकंती आणि या गावातील मासेमारी करणाऱ्या रान माणसांचे अनुभव गोष्टींमधून ऐकता येणार आहेत. या सोबत आचरा गावात शाश्वत निसर्ग पर्यटनाच्या संधीही जाणता येणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांनी या निसर्गशाळेचा आनंद घेण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहिती साठी कपिल गुरव ( आचरा) +91 +919421263056/ 9049845999 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page