बांदा भाजपकडून सत्कार
💫बांदा दि.२४-:* भारतीय जनता युवा मोर्चा बांदा मंडळातर्फे तळवणे गावची कन्या राधिका घाटये हीची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य संदीप नेमळेकर, तालुका सचिव ज्ञानेश्वर सावंत, तालुका सरचिटणीस नारायण कांबळी, युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, तालुका उपाध्यक्ष सिद्धेश कांबळी, सचिन प्रभू, बांदा युवा मोर्चा शहर अध्यक्ष साई सावंत, अमित प्रभू, सुहास गावडे, संतोष गावडे, निलेश तळवणेकर, हर्षद रेडकर, विश्राम परुळेकर, संतोष घाटे, प्रवीण गावडे, लवू घाटये, निशा घाटये, मनीष केरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. भाजपा प्रदेश चिटणीस माजी खा. निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्याकडून पुढील वाटचालीस सहकार्य करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करण्याची ग्वाही जावेद खतीब यांनी दिली.
