खोटी प्रतिष्ठा मिळवून सहानुभूतीचे राजकारण करू नये.
*💫कणकवली दि.२४-:* आज राष्ट्रवादी पक्षात झालेला पक्ष प्रवेश हा शिवसेनेतून झालेला आहे.आज राष्ट्रवादी पक्षाने कणकवलीत घेतलेल्या पक्ष प्रवेशाशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नसून ऍड. प्राजक्ता शिंदे ह्या शिवसेना तालुका कायदा आघाडी पदावर नियुक्त होत्या.त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींचा भारतीय जनता पार्टीशी संबंधित नाही. राष्ट्रवादी पक्षाने उगाचच दिशाभूल करून खोटी प्रतिष्ठा मिळवून राजकारण करू नये.अशा शब्दात सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संतोष उर्फ पप्पू पूजारे यांनी टोला लगावला आहे.
