धाकोरे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान:श्री पावणादेवी ट्रस्ट धाकोरे यांचे आयोजन.

⚡सावंतवाडी ता.१९-: श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट धाकोरे व ऑन कॉल रक्तदाते संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मातोश्री सेवा धाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई च्या सहकार्याने रक्तदान ,डोळे तपासणी शिबिर धाकोरे प्राथमिक शाळा नं.१ येथे घेण्यात आले.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून श्री धन्वंतरी प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मातोश्री सेवाधाम ट्रस्ट,मुंबई कर्मचारी सोनल घाडी, ऑनकॉल रक्तदाते संस्थेचे कर्मचारी सचिवबाबली गवंडे,खजिनदार.सिदार्थ पराडकर , एस एस पीएम रक्तपेढी चे वरिष्ठ अधिकारी मनिष यादव आणि त्यांची टीम व धाकोरे गावचे ग्रामस्थ चंद्रकांत मुळीक, पावणादेवी सेवा ट्रस्ट चे. अध्यक्ष सागर मुळीक ,सचिव सुनिल मुळीक, खजिनदार निलेश मुळीक ,सरपंच रोहिणी मुळीक,
गणेश मुळीक,माजी सरपंचअशोक मुळीक
शंकर मुळीक, बाळकृष्ण मुळीक, संतोष मुळीक, दीपक मुळीक, प्रज्वल मुळीक,पोलीस पाटील श्रीराम प्रभुराळकर संदेश मुळीक,जयवंत मुळीक,सदगुरू मुळीक आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री पावणादेवी ट्रस्ट चे कौतुक करून त्यांच्याकडून अशीच अधिकाधिक समाजपयोगी कामे व्हावीत असे सांगितले.
ऑन कॉल रक्तदाते संस्था सचिव बाबाली गवंडे यांनी ऑन कॉल रक्तदाते संस्था चे काम कसे चालते तसेच सदरील संस्था कशाप्रकारे काम करते याची माहिती देत श्री पावणादेवी ट्रस्ट व ग्रामस्थांचे कौतुक केले.

धाकोरे गावात श्री पावणादेवी ट्रस्ट वतीने पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महिलांनी सुद्धा रक्तदान करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला. या शिबिरात २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले

ट्रस्ट च्या वतीने तसेच ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या वतीने रक्तदान केलेल्या दात्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.तसेच मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने डोळे तपासणी करून अगदी १८० रुपयात चष्मा उपलब्ध करून देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुवा संदेश मुळीक यांनी केले.तर आभार श्री पावणादेवी ट्रस्ट च्या वतीने मानण्यात आले.

You cannot copy content of this page