२४ एप्रिल रोजी आयोजन; ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी छोटा चॅम्पियन स्पर्धा, सहभागी होण्याचे आवाहन..
कणकवली : येथील श्री फोंडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने व सिंधुदुर्ग जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स यांच्या मान्यतेने २४ एप्रिल रोजी कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी छोटा चॅम्पियन जिल्हास्तरीय जुनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी समीर राऊत यांच्याशी संपर्क साधावा.
