ट्रॅम्पोलिनमध्ये मंथन उकार्डेचे यश…

चेन्नईतील निवड चाचणीत प्रथम क्रमांक; चीनमधील आशियाई स्पर्धेसाठी निवड..

कणकवली : चेन्नई येथे पार पडलेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत ट्रॅम्पोलिन खेळप्रकारात मंथन पराग उकार्डे याने उल्लेखनीय यश संपादन केले. चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप स्पर्धेत तो सहभागी होणार आहे.

दुसऱ्या आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेच्या निवड चाचणीत मंथन सहभागी झाला होता. ही निवड चाचणी १८ व १९ एप्रिल रोजी चेन्नई येथे पार पडली. या स्पर्धेत देशभरातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मंथनने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम स्थान पटकावले.

मंथन हा कलमठ गावचे सुपुत्र पराग उकार्डे यांचा मुलगा असून, कनकनगर येथील रहिवासी रश्मी हर्णे यांचा नातू आहे. लहान वयातच खेळाप्रती असलेली आवड, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे.

त्याला अकॅडमी अजय क्लबचे अजय म्हापूसकर तसेच प्रशिक्षक शुभम तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page