चिपी विमानतळासंदर्भात पुन्हा १० फेब्रुवारी रोजी आढावा बैठक घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

आमदार वैभव नाईक यांची माहिती *💫कणकवली दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळासंदर्भात आढावा बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अथितीगृह मुंबई येथे पार पडली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे मुख्य सचिव, उद्योग विभागाचे सचिव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव, आयआरबीचे प्रमुख अधिकारी व विविध खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत DGCA समितीने चिपी विमानतळाची…

Read More

*_देवगड उपसभापती रविंद्र तिर्लाेटकर यांची वर्णी लागण्याची शक्यता…

डाॅ.अमाेल तेली यांनी दिला राजीनामा ;8 फेब्रुवारी राेजी हाेणार निवडणुक *💫देवगड दि.०२-:* देवगड पंचायत समितीचे उपसभापती डाॅ.अमाेल तेली यांनी आपल्या पदाचा पक्ष ध्येय धाेरणानुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त उपसभापती जागेसाठी 8 फेब्रुवारी राेजी निवडणुक प्रक्रिया हाेणार असून यासाठी भाजपाचे पंचायत समिती सदस्य रविंद्र तिर्लाेटकर यांचे नाव पक्षाच्या वरिष्ठांनी निश्चित केल्याची राजकिय वर्तुळात चर्चा केली जात आहे….

Read More

शिवसेना नागरीकांना न्याय देणारा पक्ष आहे-:बाबुराव धुरी…

*💫दोडामार्ग दि.०२सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे जी पूरहानी झाली, त्यातील नुकसानग्रस्ताना अजून मदत अडीच कोटीचे अनुदान वर्ग झाल्याची माहिती सेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिली आहे. लवकरच ही भरपाई वाटप करण्यात येणार आहे. शिवसेना ही तळागाळातील नागरीकांना न्याय देणारा पक्ष आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे जी पूरहानी दोडामार्ग तालुक्यात झाली, त्यानंतर सेनेच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंपासून…

Read More

खुल्या निबंध लेखन स्पर्धेत पुणेची सुकन्या आरु प्रथम…

*💫वेंगुर्ले दि.०२-:* नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित खुल्या निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर – पुणे येथील सुकन्या संतोष आरु प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. युवा सप्ताह प्रतिभागीता दिवस अंतर्गत ‘तरुणाईमध्ये वाढते आत्महत्येचे प्रमाण: एक गंभीर समस्या ‘ या विषयावर आयोजित खुल्या निबंध लेखन स्पर्धेत पुणे,कोल्हापूर,मुंबई सह ९२ स्पर्धकांनी…

Read More

सिंधुदुर्गातील आंतरजिल्हा बदली बाबतचे प्रश्न खास बैठक लावून सोडविणार…

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही;शिक्षक समितीला आश्वासन;आमदार वैभव नाईक यांचा पुढाकार. *💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली बाबत निर्माण झालेले विविध प्रश्न लवकरच मंत्रालयात खास सभा घेऊन सोडविणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकारी यांना दिली.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र…

Read More

माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त सविता आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

*💫सावंतवाडी दि.०२-:* पंचायत समिती माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज त्यानी सविता आश्रमास भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत सुनील राऊळ, सैनिक बँक सीईओ, प्रताप परब आदी उपस्थित होते.

Read More

घुमडे उपसरपंच पदी राजेश सावंत यांची बिनविरोध निवड

*💫मालवण दि.०२-:* घुमडे गावच्या उपसरपंचपदी राजेश अशोक सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच सुधीर वस्त यांच्या राजीनाम्या नंतर रिक्त झालेल्या जागेसाठी राजेश सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ग्रामसेवक युती युवराज चव्हाण यांनी राजेश यांची बिनविरोध निवड जाहीर केली. दरम्यान, जेष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सर्वाना सोबत घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे राजेश…

Read More

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परिवहन विभागाकडून गांधीगिरीचा वापर

सिंधुदुर्गनगरी ता ०२          वारंवार विनंती अथवा दंडात्मक कारवाई करूनही जिल्ह्यात सीटबेल्ट व हेल्मेट शिवाय प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागा मार्फत अशा वाहनचालकांवर पुष्पक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यात २०० वाहनचालकांवर गांधीगिरी पद्धतीने कारवाई करण्यात आली. वाहन चालवतांना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे सुरक्षेच्या दृतीने…

Read More

मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थानच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

सिंधूदुर्गनगरी ता २ कोरोना संक्रमणामुळे १८ मार्च २०२० पासून सलग चार वेळा मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्याच्या निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे निवडणुकावर आणलेली स्थगिती उठली असून मुदतवाढ मिळालेल्या संस्थासह २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे पावणे आठशे सहकारी संस्थाच्या निवडणुका होणार आहेत.

Read More

महिलांना सक्षम बनण्यासाठी योग्य प्रशिक्षणांची सांगड -:सभापती मनोज रावराणे…

असलदे येथे विविध प्रशिक्षणांचे उद्घाटन *💫कणकवली दि.०२-:* असलदे ग्रां.प.ने येथील महीलांना सक्षम करण्यासाठी १४ वा वित्त आयोग कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत शिवणकला तर युवकांना इलेक्ट्रिकल टेक्निशियन सारखा महत्वाचे प्रशिक्षण व तेही पूर्ण एक महिना कालावधी करीता घेत असल्याने खरोरच कौकास्पद आहे. प्रशिक्षणाचा निधी निव्वळ दोन ते तिन दिवसाचे प्रशिक्षण न देता एक महीना कालावधीचे प्रशिक्षण…

Read More
You cannot copy content of this page