*💫मालवण दि.०२-:* घुमडे गावच्या उपसरपंचपदी राजेश अशोक सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच सुधीर वस्त यांच्या राजीनाम्या नंतर रिक्त झालेल्या जागेसाठी राजेश सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ग्रामसेवक युती युवराज चव्हाण यांनी राजेश यांची बिनविरोध निवड जाहीर केली. दरम्यान, जेष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सर्वाना सोबत घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे राजेश सावंत यांनी स्पष्ट केले. यावेळी सरपंच सुभाष बिरमोळे, माजी उपसरपंच सुधीर वस्त, स्नेहल बिरमोळे, चंदा वस्त, उमेश परब, श्रेया राणे, रसिका बिरमोळे, ग्रामसेविका युती चव्हाण उपस्थित होते. दरम्यान, माजी जिप अध्यक्ष अशोक सावंत, सुरेश बिरमोळे, रवी टेंबुलकर, छोटू सावजी यांनी उपस्थित राहत उपसरपंच राजू सावंत यांना शुभेच्छा दिल्या. भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनीही सावंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
घुमडे उपसरपंच पदी राजेश सावंत यांची बिनविरोध निवड
