सिंधूदुर्गनगरी ता २ कोरोना संक्रमणामुळे १८ मार्च २०२० पासून सलग चार वेळा मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्याच्या निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे निवडणुकावर आणलेली स्थगिती उठली असून मुदतवाढ मिळालेल्या संस्थासह २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे पावणे आठशे सहकारी संस्थाच्या निवडणुका होणार आहेत.
मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थानच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा
