पणदूर-घोटगे राज्यमार्गाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते भुमिपूजन

एस.आर.बजेट अंतर्गत ५ कोटी ६५ लाख रु निधी मंजूर *💫कुडाळ दि०९-:* कुडाळ तालुक्यातील पणदूर-घोटगे या राज्यमार्गासाठी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून ५ कोटी ६५ लाख रु निधी मंजूर झाला आहे. एस. आर. बजेट मधून हा निधी मंजूर करण्यात आला असून या राज्यमार्गाच्या कामाचे भुमिपूजन आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात…

Read More

मालवण येथील वृद्धाची गळफास लावून आत्महत्या

*💫मालवण दि.०९-:* मालवण पेट्रोल पंप समोर राहणाऱ्या धोंडू उर्फ बबन शंकर बगाड (वय ६२) या प्रौढ इसमाचा मृतदेह त्यांच्या घरा शेजारील बगाड चाळीतील जुन्या पडीक घरात गळफास लावलेल्या स्थितीत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दिसून आला. याबाबत मालवण पोलीस स्थानकात खबर देण्यात आली आहे. मालवण पेट्रोल पंप समोर राहणारे धोंडू बगाड हे पेट्रोल पंप वर…

Read More

*१४ फेब्रुवारी रोजी मालवण येथे गंगाराम गवाणकर यांची प्रकट मुलाखात

भालचंद्र केळुसकर व गौरव ओरसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती* *💫मालवण दि.०९-:* अष्टपैलू कलानिकेतन मालवण आणि स्वराध्या फाऊंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा नागरी सत्कार व प्रकट मुलाखातीचा ‘सलाम गंगाराम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अष्टपैलु कलानिकेतन मालवणचे अध्यक्ष भालचंद्र…

Read More

जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यु संख्या १७० झाली आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील 45 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. त्यास क्षयरोगाचा आजार होता. तसेच देवगड तालुक्यातील कुवळे येथील 67 वर्षीय पुरुषाचाही आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यास उच्चरक्तदाब, मधुमेह व ह्रदय रोगाचा त्रास होता. तर…

Read More

*१४ फेब्रुवारी हा दिवस “मातृ-पितृ दिन” म्हणून साजरा करण्यात यावा

हिंदू जनजागृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी* *💫सिंधूदुर्गनगरी दि.०९-:* व्हॅलेंटाईन-डे साजरा करण्याची पाश्चात्य संस्कृती मोडीत काढून १४ फेब्रुवारी हा दिवस “मातृ-पितृ दिन” म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गेल्या काही वर्षात १४ फेब्रुवारी हा दिवस “व्हॅलेंटाईन-डे” म्हणून साजरा करण्याची प्रथा भारतात रूजू झाली. प्रेमाच्या नावाखाली या संकल्पनेमुळे युवा पिढी अनैतिकतेकडे ओढली…

Read More

वेंगुर्ला येथे १२ रोजी गोड्या पाण्यातील माशांपासुन खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण…_

*💫वेंगुर्ला दि.०९-:* महिलांसाठी खास गोड्या पाण्यातील माशांपासुन विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण वेंगुर्ले येथील साईमंगल कार्यालय येथे शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत आयोजित केले आहे. भाजपाचे सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती कृषी व मत्स्यपर्यटन सह.संस्थेच्या वतीने १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान सावंतवाडीत जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे मत्स्य…

Read More

आजची आव्हाने स्वीकारताना पत्रकारांनी सत्यमेव जयते ची पाठ सोडू नये ; नाना पटोले ;

मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आदर्श पुरस्कार वितरण *💫सावंतवाडी दि.०९-:* आज पत्रकारांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा सामना करत सत्यमेव जयतेची भूमिका पत्रकारांनी सातत्याने घेण्याची गरज घेत सजग राहिले पाहिजे, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार विरतण सोहळा प्रंसगी…

Read More

तुळस येथे उद्यापासून दशावतारी नाट्य महोत्सव…

वेताळ प्रतिष्ठान तुळसतर्फे आयोजन_ म💫वेंगुर्ला दि.०९-:* वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग, तुळस यांच्यातर्फे अश्वमेध अंतर्गत दि.१० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव वेताळ मंदिर तुळसच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात दि.१० रोजी खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली यांचा ‘चौरंगीनाथ‘, दि.११ रोजी सुधीर कलिगण प्रस्तुत कलेश्वर दशावातार नाट्य मंडळ नेरुर…

Read More

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठीचा उर्वरित निधी लवकर उपलब्ध करून द्यावा

*जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत दिला प्रस्ताव* सिंधुदुर्गनगरी ता ०९ सिधुदुर्गनगरी येथे होत असलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठी आवश्यक असलेला उर्वरित १ कोटी ५० लाखाचा निधी मिळावा. याबाबतचा प्रस्ताव पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील भेटीत सादर केला आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री…

Read More

मल्लसम्राट प्रतिष्ठान संघटनेतून उद्याचे महाराष्ट्र केसरी जिंकणारे पैलवान निर्माण होतील-: प्रा. शरद शिरोडकर…

मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी वर्धापन दिन *💫सावंतवाडी, दि.०९-:* कुस्ती सिंधुदुर्गात तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम मल्लसम्राट प्रतिष्ठान करीत आहे. या संघटनेतून नक्कीच उद्याचे महाराष्ट्र केसरी जिंकणारे पैलवान निर्माण होतील असा विश्वास आज येथे पानवळ कॉलेजचे प्राध्यापक शरद शिरोडकर यांनी व्यक्त केला. मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडीचा वर्धापन दिन येथे आज साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी…

Read More
You cannot copy content of this page