मालवण येथील वृद्धाची गळफास लावून आत्महत्या

*💫मालवण दि.०९-:* मालवण पेट्रोल पंप समोर राहणाऱ्या धोंडू उर्फ बबन शंकर बगाड (वय ६२) या प्रौढ इसमाचा मृतदेह त्यांच्या घरा शेजारील बगाड चाळीतील जुन्या पडीक घरात गळफास लावलेल्या स्थितीत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दिसून आला. याबाबत मालवण पोलीस स्थानकात खबर देण्यात आली आहे. मालवण पेट्रोल पंप समोर राहणारे धोंडू बगाड हे पेट्रोल पंप वर कामास होते. पेट्रोल पंपवर रात्रीची ड्युटी पूर्ण करून आज सकाळी ९ वाजता धोंडू हे आपल्या घरी आले होते. मात्र सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नीला घरा लगतच्या बगाड चाळीतील जुन्या पडीक घरात धोंडू यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला असता पत्नीने टाहो फोडला. याबाबतची माहिती मालवण पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर मालवण पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, नितीन नरळे, सिद्धेश चिपकर, विलास टेम्बुलकर, आदी पोलीस तसेच पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण यांनी घटनास्थळी हजर होऊन पाहणी केली. धोंडू बगाड हे गेले काही महिने आजारपणाने त्रस्त होते. मात्र त्यांच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट झाले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. धोंडू यांचे भाऊ दिगंबर बगाड यांनी याप्रकरणी पोलीस स्थानकात खबर दिली आहे. धोंडू यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

You cannot copy content of this page