*💫सिंधूदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यु संख्या १७० झाली आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील 45 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. त्यास क्षयरोगाचा आजार होता. तसेच देवगड तालुक्यातील कुवळे येथील 67 वर्षीय पुरुषाचाही आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यास उच्चरक्तदाब, मधुमेह व ह्रदय रोगाचा त्रास होता. तर आणखी ३ नवीन कोरोना रुग्ण मिळाले असून ६ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या १६६ रुग्ण उपचाराखाली आहेत.
जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु
