*स्वाभिमान गहाण ठेवलेल्या राजन तेलीना सेनेवर बोलायचे अधिकार नाहीत*

*💫सावंतवाडी दि.१४-:* भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी काल केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. भाजपने या आधी कधीच दहशद वाद निर्माण केला नाही होता. परंतु राणे कंपनीने जिल्ह्यात दहशद वाद माजवला आहे. स्वाभिमान गहाण ठेवलेल्या जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सेनेवर बोलायचे…

Read More

मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाची सर्वसाधारण सभा संपन्न…

*सभेत समाजाच्या विविध विषयांवर चर्चा *💫सावंतवाडी दि.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाची सर्वसाधारण सभा आज मालवण-वराड हडपीवाडी येथील नम्रता मंगल कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे मावळते जिल्हाध्यक्ष निलेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्यानंतर वार्षिक…

Read More

*टेरेसवरून पडल्याने सावंतवाडी येथील ७ वर्षीय बालक गंभीर जखमी

सावंतवाडी : सालईवाडा येथील एका इमारतीवरून एक ७ वर्षीय बालक टेरेसवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. विघ्नेश सावंत असे त्या बालकांचे नाव असून अधिक उपचारासाठी त्याला पडवे येथील लाईफ टाईम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेरेसवरून पडल्यानं त्याची प्रकृती गंभीर आहे.

Read More

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची प्रक्रिया थांबविण्यात यावी…

▪️शिक्षक भारतीची मागणी *💫मालवण दि.१३-:* परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना धारक शिक्षकांच्या अंशदान कपातीच्या वार्षिक हिशेब तक्त्यात तफावती आहेत. या तफावती दूर करून त्यात नियमितता व अचूकता येत नाही तोपर्यंत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची प्रक्रिया राबविण्यात येऊ नये अशी मागणी करतानाच या योजने बाबत शिक्षकांना कोणतीही माहिती नसल्याने सदर प्रक्रिया राबविणे अन्यायकारक आहे असे म्हणणे…

Read More

*ओसरगाव येथे बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कस्टम विभागाची कारवाई

*टेम्पोसह ४९ लाख ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त* *💫कणकवली दि.१३-:* गोव्याहून नाशिक च्या दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोसह तब्बल 49 लाख 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल कस्टम विभागाच्या सिंधुदुर्ग च्या पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ओसरगाव येथे केली. कस्टम विभागाचे अधीक्षक अभिजित भिसे यांच्यासह पथकाची…

Read More

अवैद्य काळात दगडांच्या खाणीवर कारवाई करा…

गुरुदास गवंडे यांची सावंतवाडी प्रताधिकाऱ्यांकडे मागणी : इन्सुली, सोनुर्ली व व्यत्ये नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात सुरुंग ब्लास्टिंग_* *💫बांदा दि.१३-:* जिल्ह्यातून गोव्यात जाणारी अवैद्य वाळू आणि खडी यांच्यावर नजर ठेवून प्रांतअधिकारी अशी कारवाई करत असतील तर ते योग्यच आहे. तसेच त्यांनी इन्सुली, सोनुर्ली व व्यत्ये आधी ठिकाणी असणाऱ्या अवैद्य काळात दगडांच्या खाणीवर त्यांनी कारवाई करावी…

Read More

पाडलोस ग्रामसचिवालयाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू….

पं. स. सदस्य रेश्मा नाईक यांनी केली पाहणी *💫बांदा दि.१३-:* पाडलोस ग्रामसचिवालय इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. बांधकाम पूर्णत्वास येण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असून यासाठी आपण पंचायत समिती तसेच आमदार, खासदार यांच्यामार्फत अतिरिक्त निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन, पंचायत समिती सदस्य रेश्मा नाईक यांनी दिले. ग्रामसचिवालयाचे बांधकाम पाहणीदरम्यान ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख…

Read More

रोणापालमधील शेतकऱ्याचा गव्याने केला पाठलाग;..

मिरची बागायतीचे केले नुकसान_ *💫बांदा दि.१३-:* रोणापाल तिलारी कालव्याजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास दोन गवे ग्रामस्थांच्या दृष्टीस पडले होते. त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा त्यांनी आपला मोर्चा तळेवाडी व देऊळवाडीतील भरवस्तीत वळवला. त्याचदरम्यान शेतकरी प्रकाश गावडे यांनी गव्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता एक गवा त्यांच्या अंगावर धावून आल्याचे त्यांनी सांगितले. काही फुटांच्या अंतरावर गवा आपल्यापासून…

Read More

दाणोली-सावंतवाडीमार्गे गोवा रस्ता मजबुतीकरण करावा…

मंगेश तळवणेकर यांचे शिवराम दळवींना आवाहन *💫सावंतवाडी दि.१३-:* दाणोली बावळाट-बांदा रस्ता मजबुतीकरण केल्यास सावंतवाडी पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. माजी आमदार शिवराम दळवींनी सावंतवाडीचा विचार आधी करून आपली मागणी बदलून दाणोली-सावंतवाडीमार्गे गोवा असा रस्ता मजबुतीकरण करावा, अशी मागणी वजा आवाहन माजी शिक्षण आरोग्य सभापती तथा श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी…

Read More

विक्रांत सावंत म्हणजे सनम तेरी कसम मधील हिरो

*नगराध्यक्ष संजू परब यांचा खोचक टोला; मी धमकी दिली, काय करायचं ते करा* *💫सावंतवाडी दि.१३-:* सेनेचे कार्यकर्ते २४ तासाच्या आत भाजपच्या नगराध्यक्ष यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक करावी असे सांगत धरणे आंदोलन करून २० मिनिटात उठतात ही शिवसेना नसून चिवसेना असल्याची जोरदार टीका नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आताची शिवसेना बाळासाहेबांची सेना राहिली…

Read More
You cannot copy content of this page