*स्वाभिमान गहाण ठेवलेल्या राजन तेलीना सेनेवर बोलायचे अधिकार नाहीत*

*💫सावंतवाडी दि.१४-:* भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी काल केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. भाजपने या आधी कधीच दहशद वाद निर्माण केला नाही होता. परंतु राणे कंपनीने जिल्ह्यात दहशद वाद माजवला आहे. स्वाभिमान गहाण ठेवलेल्या जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सेनेवर बोलायचे अधिकार नाहीत. असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. तसेच नगराध्यक्ष संजू परब हे करत असलेली वक्तव्य ही नगराध्यक्ष पदाला शोभत नाहीत. या पूर्वी कोणत्याही नगराध्यक्षांनी असे केले नाही . संजू परब यांनी पोकळ धमक्या देण्या ऐवजी सावंतवाडीच्या विकासावर लक्ष द्यावे असे ते म्हणाले आहेत. यावेळी संजू परब हे खासदार राऊत यांच्या पाया पडायला आले तेव्हा ते राणे कुटुंबावर काय काय बोलले ते जाहीर करू असा इशारा रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

You cannot copy content of this page