*💫बांदा दि.१४-:* शेर्ले – देऊळवाडी येथील तुकाराम विठ्ठल धुरी (६२) या वृद्धाने आज सकाळी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते कित्येक महिने अंथरुणाला खिळून होते. अखेर आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज नातलगांनी व्यक्त केला. मयत तुकाराम धुरी हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. भजन, किर्तन यात त्यांना जास्त रुची होती. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळून होते. . आज सकाळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्यांनी विहीरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. मुलगा विठ्ठल धुरी यांनी याबाबत बांदा पोलीसात खबर दिली. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पी. एस. पवार करीत आहेत.
शेर्लेत वृद्धाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या…
