मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाची सर्वसाधारण सभा संपन्न…

*सभेत समाजाच्या विविध विषयांवर चर्चा

*💫सावंतवाडी दि.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाची सर्वसाधारण सभा आज मालवण-वराड हडपीवाडी येथील नम्रता मंगल कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे मावळते जिल्हाध्यक्ष निलेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्यानंतर वार्षिक खर्च व जमाखर्चाचे वाचन तसेच समाज सर्व्हेक्षण व जातपडताळणी बाबतही चर्चा करण्यात अाली. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडीबाबत चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या अध्यक्षपदी भगवान रणसिंग यांची बिनविरोध निवड झाली. निवडीबद्दल नूतन अध्यक्षांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page