*नगराध्यक्ष संजू परब यांचा खोचक टोला; मी धमकी दिली, काय करायचं ते करा*
*💫सावंतवाडी दि.१३-:* सेनेचे कार्यकर्ते २४ तासाच्या आत भाजपच्या नगराध्यक्ष यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक करावी असे सांगत धरणे आंदोलन करून २० मिनिटात उठतात ही शिवसेना नसून चिवसेना असल्याची जोरदार टीका नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आताची शिवसेना बाळासाहेबांची सेना राहिली नसून, त्यांच्यात बाळासाहेबांचे रक्त दिसत नसून, आघाडीचे रक्त वाहू लागले आहे असा खोचक टोला लगावला आहे. एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे विक्रांत सावंत हे सनम तेरी कसम या फिल्म मधील हिरो सारखी असल्याचा टोला लगावला असून, राजकारण आपले काम नसून आपण फिल्म मध्ये काम करावे असा खोचक टोला विक्रांत सावंत यांना लगावला आहे.
आम्ही काल जळलेला पुतळा हा सालईवाडा येथील चौकात जाळला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. सेनेने पुतळा जाळून सुरुवात केल्यानंतर त्याचेच प्रतिउत्तर काल सावंतवाडी व आज कुडाळ येथे देण्यात आले आहे. सेनेने असा प्रकार पुन्हा केल्यास यापुढे ही जाऊ असा इशाराच यावेळी परब यांनी दिला आहे. आपण धमकी दिली असून सेनेने काय करायचं ते करा असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
