भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली ; खासदार राऊत यांनी प्रथम आक्षेपार्ह विधान केले
*💫सावंतवाडी दि.१३-:* शिवसेनेने केलेल्या कृतीचे पडसाद काल सावंतवाडी आणि आज कुडाळ मध्ये भाजपकडून उडले आहेत. असे मत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले यश, गृहमंत्री अमित शहा यांनी जिल्ह्यात ठेवलेले पाऊल यामुळेच शिवसेना अस्वस्थ झाली आहे. खासदार राऊत यांनी प्रथम माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यानेच माजी खासदार निलेश राणे यांनी त्याला प्रतिउत्तर दिले होते. जिल्ह्यात निर्माण होत असलेली परिस्थितीला सर्वस्वी शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे. शिवसेनेने भाजप नेत्यांवर टीका करताना एकदा विचार करावा असे ते म्हणाले आहेत. आमच्या नेत्यांवरील टीका कार्यकर्ते सहन करणार नाहीत. भाजपच्या नेत्यांवर टीका करण्याची खुमखुमी असेल तर विनायक राऊत आणि दोन्ही आमदारांनी राजीनामे द्यावेत आणि थेट निवडणूक लढवावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहरध्यक्ष अजय गोंदावले,नगरसेवक आंनद नेवगी दिलीप भालेकर,बंटी पुरोहित शहर सरचिटणीस परीक्षेत मांजरेकर आदी उपस्थित होते
