शिवसेना-राणे वादाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
*💫कणकवली दि.१३-:* माजी खासदार निलेश राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या वादाचे पडसाद आता कार्यकर्ता पातळीवर एकमेकांच्या नेत्यांच्या पुतळ्याना जोडे लागवण्यापर्यंत उमटू लागलेत. राजकीय केंद्रबिंदू असलेल्या कणकवलीत याचे पडसाद उमटून सामाजिक शांतता भंग होऊ नये यासाठी पोलीस दलाने दंगा काबू नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या कणकवली शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. कणकवली शहर जिल्ह्याचे राजकीय सेंटर पॉईंट आहे. राणेंचे आपल्या कार्यकर्त्याना आदेश कणकवली तुनच निघतात. माजी खासदार निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला ओरोस येथे शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोडे लगावल्यानंतर सावंतवाडीत नगराध्यक्ष संजू परब आणि सहकाऱ्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे लागवले. जिल्ह्यातील शिवसेना विरुद्ध राणे या पेटलेल्या वादाचे परिणाम कणकवली शहरावर होऊ नये याची खबरदारी घेत पोलीस दलाने महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची दंगा काबू पथक शहरात तैनात केली आहेत. १ प्लस २० पुरुष पोलीस कर्मचारी आणि १० महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा या दंगा काबू पथकात समावेश आहे.
