*भाजप प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारती यांची टीका*
*💫सावंतवाडी दि.१३-:* भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारती यांनी सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली होती. यावेळी ते म्हणाले की, भाजपच्या संघटना वाढीसाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघडी सरकार हे अससंवेदनशील सरकार असल्याची टिका त्यानी केली आहे. महाराष्ट्रात एका २२ वर्षीय मुलींनी आत्महत्या केली असताना देखील हे सरकार एक शब्द देखील बोलत नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, अमित परब, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.
