अवैद्य काळात दगडांच्या खाणीवर कारवाई करा…

गुरुदास गवंडे यांची सावंतवाडी प्रताधिकाऱ्यांकडे मागणी : इन्सुली, सोनुर्ली व व्यत्ये नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात सुरुंग ब्लास्टिंग_*

*💫बांदा दि.१३-:* जिल्ह्यातून गोव्यात जाणारी अवैद्य वाळू आणि खडी यांच्यावर नजर ठेवून प्रांतअधिकारी अशी कारवाई करत असतील तर ते योग्यच आहे. तसेच त्यांनी इन्सुली, सोनुर्ली व व्यत्ये आधी ठिकाणी असणाऱ्या अवैद्य काळात दगडांच्या खाणीवर त्यांनी कारवाई करावी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात सुरुंग ब्लास्टिंग तसेच अनधिकृत खडी उत्खनन केले जाते त्याच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे. आज सर्वसामान्य नागरिक आहेत ज्यांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून घरे मंजूर झाली त्यांना वाळू व खडी मिळत नाही. पण अशी सर्रास वाळू आणि खडी गोवा राज्याला मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गातून नेली जाते व शासनाचा महसूल बुडविला जातो. सावंतवाडी उपविभागीय महसूल अधिकारी सुशांत खांडेकर यांनी काल इन्सुली या ठिकाणी अनधिकृत वाळू व खडी वाहतुकीवर केलेली कारवाई योग्य असून त्यांच्या या कार्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शुभेच्छा आहेत. अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये अनाधिकृत खडी वाळू पास मध्ये खाडाखोड करून जर वाहतूक केली जात असेल तर ती महसूल यंत्रणेला घातक आहे. आम्ही वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सावंतवाडी तहसीलदाराना निवेदन दिलेले आहे. परंतु काल जी कारवाई प्रांताधिकारी श्री.खांडेकर यांनी केलेली आहे ती योग्य असून यापुढे त्यांनी अशीच कारवाई असे आवाहन गुरू गवंडे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page