*टेम्पोसह ४९ लाख ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त*
*💫कणकवली दि.१३-:* गोव्याहून नाशिक च्या दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोसह तब्बल 49 लाख 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल कस्टम विभागाच्या सिंधुदुर्ग च्या पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ओसरगाव येथे केली. कस्टम विभागाचे अधीक्षक अभिजित भिसे यांच्यासह पथकाची नॅशनल हायवेवर गस्त सुरू असताना गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर कंटेनर दिसला. ड्रायव्हर ने विसंगत उत्तरे दिल्यामुळे कंटेनर ची झडती घेतली असता तब्बल 32 लाख रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू आत आढळून आली. या दारुसह आयशर कंटेनर एकूण 49 लाख 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल कस्टम विभागाच्या पथकाने जप्त केला.पंचांसमक्ष केलेल्या प्राथमिक चौकशीत कंटेनर चालकाने सदर दारू गोव्याहून नाशिक च्या दिशेने नेत असल्याची माहिती समोर आली आहे. कंटेनर ड्रायव्हर व त्याच्या सहकाऱ्याला कस्टम अधिकाऱ्यांनी एक्साईज विभागाच्या ताब्यात दिले असून एक्साईज विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ही कारवाई कस्टम अधीक्षक अभिजित भिसे, राजेश फुले, निरीक्षक दिनेशकुमार मीना, राजेश लाडे, सारंग, हेड हवालदार प्रेमदत्त माने, संदीप कांबळी, निश्चय गंगावणे, पांडुरंग डगरे, चालक रवींद्र वारेसे आदींनी केली.
