रोणापालमधील शेतकऱ्याचा गव्याने केला पाठलाग;..

मिरची बागायतीचे केले नुकसान_

*💫बांदा दि.१३-:* रोणापाल तिलारी कालव्याजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास दोन गवे ग्रामस्थांच्या दृष्टीस पडले होते. त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा त्यांनी आपला मोर्चा तळेवाडी व देऊळवाडीतील भरवस्तीत वळवला. त्याचदरम्यान शेतकरी प्रकाश गावडे यांनी गव्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता एक गवा त्यांच्या अंगावर धावून आल्याचे त्यांनी सांगितले. काही फुटांच्या अंतरावर गवा आपल्यापासून होता, केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आपण थोडक्यात बचावल्याचे त्यांनी सांगितले. झालेला प्रकार ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत गव्यांनी आपला मोर्चा जंगलाच्या दिशेने वळवला होता. झोपी गेलेल्या वनविभागाला जाग कधी येणार अन् आमचे गव्यांपासून संरक्षण कधी करणार, असा सवाल आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी केला.

You cannot copy content of this page