Headlines

जगभराचा अर्थसंकल्प ढासळला असताना नरेंद्र मोदींनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे जगभरातून कौतुक : राम कदम…

*💫सावंतवाडी दि.२८-:* कोरोनामुळे जगभराचा अर्थसंकल्प ढासळला असताना नरेंद्र मोदींनी जो देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे, त्यामुळे आज जगरभरातून मोदी सरकारचे कौतुक होत आहे. एक रूपायची वाढ न करता यात वेगळ्या योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप आमदार राम कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, शहरध्यक्ष अजय गोंदावळे,…

Read More

*बचत गटातील महिलांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सुरू

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली योजना* *💫वेंगुर्ले दि.२८-:* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज विविध प्रकारच्या उद्योगासाठी जाहीर केले. याच पॅकेजच्या माध्यमातून बचत गटात काम करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ( पीएमएफएमइ ) सन २०२० ते २०२५ या पाच वर्षे कालावधीसाठी सुरु केली आहे. सदर योजने…

Read More

आंबोली येथे मुत्युजंय दुत समितीची स्थापना….

*💫आंबोली दि.२८ विष्णू चव्हाण-:* आंबोली येथे मुत्युजंय दुत समितीची स्थापना करण्यात आली. वाढत्या अपघाताला आळा बसावा आणि तात्काळ अपघातग्रस्तांना प्राथमिक ऊपचाराची गरज लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याला मदत म्हणून हि समिती स्थापन करण्यात आली आहे आहे. आंबोली हद्दीतील अपघाताची बातमी वाहतूक पोलिसांना कळवावी तसेच मदतीसाठी तात्काळ हजर होणे जेणेकरुन कुणाचे…

Read More

ते काम तात्काळ रद्द न केल्यास उपोषण

*कोलझर गावातील हरीजन वस्तीतील ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदनाद्वारे इशारा *💫सावंतवाडी दि.२८-:* विशेष घटक योजनेखाली मंजूर झालेले काम त्या ग्रामपंचायतीतील दलित वस्ती ऐवजी दुसऱ्याच ठिकाणी सुरू असल्याने ते काम तातडीने आदेश देऊन थांबवण्यात यावे अशी मागणी गाव मौजे कोलझर, शिरवल, उगाडे हरिजन वाडीतील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत अधिक…

Read More

*भाजप नेते राम कदम यांचे गोवा येथे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले स्वागत*

*💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी येथे सुरू असलेल्या नगराध्यक्ष चषक स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमासाठी आज भाजप नेते राम कदम हे सावंतवाडीत शहरात येत असून, त्यांचे गोवा येथे आगमन झाल्यानंतर सावंतवाडी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.

Read More

*संजू परब मित्रमंडळ मडूरा आयोजित रस्सीखेच स्पर्धेत कलेश्वर वेत्ये संघ विजेता

तर कोनापाल निरवडे संघ उपविजेता* बांदा-: भारतीय जनता पार्टी संजू परब मित्रमंडळ आयोजित मडूरा येथे झालेल्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेत वेत्ये गावच्या कलेश्वर वेत्ये संघाने विजेते पद पटकावले आहे. तर उप विजेतेपद कोनापाल निरवडे संघाने प्राप्त केले आहे. यावेळी विजेत्या संघाला रोख पारितोषिक व चषक देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी गावचे उपसरपंच गुणाजी गावडे यांनी संघाला…

Read More

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम संपन्न

*सावंतवाडी : दि.२६ :* सावंतवाडी शहरात आज स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी नगर परिषदेतर्फे मोती तलावाकाठी व रामेश्वर प्लाझा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. सकाळी ७.३०ते ९.३० या कालावधीत मोती तलाव सभोवतालच्या परिसरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब,…

Read More

कांदाळगाव देवालय परिसरात प्रवासी बस खाली चिरडून एकाचा मृत्यू….

*💫मालवण दि.२८-:* मालवण कांदाळगाव येथील देवालय परिसरात मुंबई हुन आलेली आराम बस पार्किंग करत असताना आराम बसच्या चाका खाली सापडून क्लिनर चा जागीच मृत्य झाला.ही घटना रविवारी सकाळी 8.45 वाजता घडली. मुंबई हुन मालवण कांदाळगाव येथे आरामबस आल्यानंतर ती देवालय परिसरातील मोकळ्या जागेत पार्किंग करत असताना बस च्या मागे असलेल्या क्लिनर चा बस च्या चाकाखाली…

Read More

_प्रमोद हडकर यांचा प्रामाणिकपणाबद्दल टीटीडीएस पर्यटन संस्थेमार्फत सत्कार…

पर्यटन व्यावसायिकाची रस्त्यात सापडलेली दीड लाखाची रक्कम केली होती परत *💫मालवण दि.२७-:* पर्यटन व्यावसायिक लीलाधर प्रमोद सावळाराम हडकर झाड यांची रस्त्यात सापडलेली दीड लाखाची रक्कम प्रामाणिकपणे प्रमोद सावळाराम हडकर यांनी स्वतः हून श्री झाड यांस परत केली. त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल टीटीडीएस पर्यटन संस्थेमार्फत त्यांची सदिच्छा भेट घेऊन शाल व श्रीफळ देऊन संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर…

Read More

मालवणचे माजी सभापती, भंडारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ दादासाहेब वराडकर यांचे निधन…

*💫मालवण दि.२७-:* मालवणचे माजी सभापती आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे माजी अध्यक्ष तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष,कट्टा गावचे रहिवाशी डॉ. चंद्रकांत उर्फ दादासाहेब विठ्ठल वराडकर (वय ९४) यांचे आज सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या…

Read More
You cannot copy content of this page