पर्यटन व्यावसायिकाची रस्त्यात सापडलेली दीड लाखाची रक्कम केली होती परत
*💫मालवण दि.२७-:* पर्यटन व्यावसायिक लीलाधर प्रमोद सावळाराम हडकर झाड यांची रस्त्यात सापडलेली दीड लाखाची रक्कम प्रामाणिकपणे प्रमोद सावळाराम हडकर यांनी स्वतः हून श्री झाड यांस परत केली. त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल टीटीडीएस पर्यटन संस्थेमार्फत त्यांची सदिच्छा भेट घेऊन शाल व श्रीफळ देऊन संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र खानविलकर, अरविंद मोंडकर, मिलिंद झाड, शामा झाड, दादा वेंगुर्लेकर, आनंद हडकर, सहदेव साळगावकर आदी पर्यटन व्यावसाईक उपस्थित होते त्यांच्या डोळ्याच्या तसेच मोडकळीस आलेल्या घरासाठी संस्थेमार्फत मदत करु, अशी ग्वाही त्यांना यावेळी देण्यात आली. त्यांनी ज्या प्रकारे आपली घरची परिस्थिती बेताची असताना स्वतःच्या डोळ्याच्या ऑपरेशन व तब्येतीवर वैद्यकीय खर्च करण्यासाठी पैसे नसतानाही त्यांनी पर्यटन व्यावसायिकांचि जी मदत केली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
