Headlines

शासनस्तर उपक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा वेंगुर्ला पंचायत समितीतर्फे सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२४-: प्लास्टिक व ई कचरा संकलन अभियान अंतर्गत जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी राबविलेल्या उपक्रमात वेंगुर्ला तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या दुर्वा विष्णू मडवळ( परुळे शाळा नं. 3), मंथन मंगेश करंगुटकर (मठ शाळा नं. 1) व जयेश बाबुराव गावडे (शाळा वरचे अणसूर )या विद्यार्थ्यांना उपक्रम मधील यशाबद्द्ल सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी
गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, तसेच पंचायत समिती सदस्य विष्णू उर्फ आप्पी फणसेकर, नितीन मांजरेकर, संकेत धुरी, पं. स. सदस्या साक्षी नार्वेकर, शितल राऊत, प्रियांका घाटवळ, सुचिता वजराटकर तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page