ख्रिश्चन बांधवांकडून एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा….

*💫वेंगुर्ला दि.२४-:* वेंगुर्ला शहरासह तालुक्यात ख्रिसमस सणाला प्रारंभ झाला असून ख्रिश्चन बांधव घरोघरी जाऊन नाताळाची गीते गाऊन एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देत आहेत. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी घरोघरी विद्युत रोषणाई तसेच येशू जन्माचे देखावे साकारले आहेत. वेंगुर्ल्यातील कलानगर, उभादांडा, दाभोसवाडा, दाभोली, भटवाडी, हॉस्पिटल नाका, साकववाडा, परबवाडा येथील ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांच्या घरी जाऊन नातळाची गीते म्हणत…

Read More

एक्साईज अधिकाऱ्याला धक्काबुक्की प्रकरणातील चौथ्या संशयितास तीन दिवसांची पोलीस कोठडी

सावंतवाडी : एक्साईज अधिकाऱ्याला धक्काबुक्की प्रकरणी फरार असलेल्या चौथ्या संशयितास बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजय सूर्यकांत कवठणकर (रा. ओटवणे) असे या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील तिघांना यापूर्वी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, चौथ्या संशयितास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील स्वप्नील कोलगावकर यांनी दिली आहे

Read More

मनसेच्या कार्यकर्त्यांचे गांधीगिरी स्टाईल आंदोलन

उप अभियंता व शाखा अभियंता यांच्या खुर्च्यांना पुष्पहार अर्पण करून केला निषेध व्यक्त *💫कुडाळ दि.२४-:* कुडाळ येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालर्यात आज गुरुवारी मनसे कार्यकर्ते ठरल्याप्रमाणे उपस्थित झाले. मात्र नेहमीप्रमाणे कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने तसेच बारा वाजेपर्यंत मनसेच्या पदाधिकाºयांनी अधिकाºयांची वाट बघूनही एकही अधिकारी आला नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या मनमानी व बेजबाबदार कारभाराचा…

Read More

युथ गेम महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशीप स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे आकीदो असोसिएशन सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे यश

८ सुवर्णपदक व २ कास्यपदकाची कमाई;यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक *💫सावंतवाडी दि.२४-:* कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले येथे घेण्यात आलेल्या युथ गेम महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशीप स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे आकीदो असोसिएशन सावंतवाडी या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन करत ८ सुवर्णपदक व २ कास्यपदकाची कमाई केली. सावंतवाडी संस्थानच्या श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी…

Read More

पाडलोसमध्ये आदर्श कडधान्य पिकाचे प्रात्यक्षिक…

कमी खर्चात शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याभर; लाभ घेण्याचे आवाहन *💫बांदा दि.२४-:* पावसाळी शेती झाल्यानंतर हिवाळ्यात शेतकऱ्यांचा कल रब्बी पिकांकडे वळतो. शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळण्यासाठी कृषी विभागाकडून पाडलोस गावात आदर्श कडधान्य पिकांचे प्रात्यक्षिक राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाडलोसमध्ये ठराविक अंतरावर चवळीची लागवड करण्यात आली आहे. केणीवाडा येथे पाडलोस कृषी…

Read More

रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी गटारात कलंटलीतीन मुशी येथील घटना

*💫सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी येथील तीन मुशी येथे रस्त्यांचा अंदाज न आल्याने एक चारचाकी एका साईट ने गटारात कलंटली आहे. ही गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Read More

शहरातील प्रभाग ८ मधील विकासकामांचे आज करण्यात आले उद्घाटन

आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ *💫सावंतवाडी दि.२४-:* शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील विकास कामांचा आज नगरसेवक आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचा हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.  यावेळी सर्वोदय नगर येथील शिक्षक कॉलनी कामत घर ते पत्रकार गजानन नाईक घरापर्यंत रस्त्यांच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर समोर हायवेला…

Read More

शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाविरोधात प्राथमिक शिक्षक संघटनाचे आंदोलन सुरू

सिंधूदुर्गनगरी ता २४ प्राथमिक शिक्षण विभागाने ५० टक्के शिक्षक उपस्थिती व सर्वकष मूल्यमापन बाबत काढलेल्या आदेशा विरोधत आक्रमक झालेल्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटना जिल्ह्याच्या राजधानीत एकवटल्या आहेत. मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षक शाळा बंद ठेवून जिल्ह्यात दाखल झाले असून शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी काढलेले आदेश तात्काळ रद्द करावेत, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या…

Read More

*सासोलीत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

*💫दोडामार्ग दि.२४-:* सासोली येथील गावठणवाड़ी येथे आज आंनद रामचंद्र परब (५२) या युवकाने घरापासून जवळच असलेल्या शेतात काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली, अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत असून आत्महत्या दारूच्या नशेत केल्याचा अंदाज आहे.

Read More

कोलगाव माध्यमिक विद्यालयाला यक्षणी मेडिकल स्टोअर कडून थर्मल गन भेट

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील कोलगाव माध्यमिक विद्यालयाला कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पिंगळी येथील यक्षणी मेडिकल स्टोअर्स कडून विद्यार्थी आणि शिक्षकांची नियमित तपासणी व्हावी यासाठी थर्मल गन भेट म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती सुखदा सुधाकर ढोके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

Read More
You cannot copy content of this page