*💫वेंगुर्ला दि.२४-:* वेंगुर्ला शहरासह तालुक्यात ख्रिसमस सणाला प्रारंभ झाला असून ख्रिश्चन बांधव घरोघरी जाऊन नाताळाची गीते गाऊन एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देत आहेत. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी घरोघरी विद्युत रोषणाई तसेच येशू जन्माचे देखावे साकारले आहेत. वेंगुर्ल्यातील कलानगर, उभादांडा, दाभोसवाडा, दाभोली, भटवाडी, हॉस्पिटल नाका, साकववाडा, परबवाडा येथील ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांच्या घरी जाऊन नातळाची गीते म्हणत शुभेच्छा दिल्या.
ख्रिश्चन बांधवांकडून एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा….
