सावंतवाडी : एक्साईज अधिकाऱ्याला धक्काबुक्की प्रकरणी फरार असलेल्या चौथ्या संशयितास बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजय सूर्यकांत कवठणकर (रा. ओटवणे) असे या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील तिघांना यापूर्वी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, चौथ्या संशयितास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील स्वप्नील कोलगावकर यांनी दिली आहे
एक्साईज अधिकाऱ्याला धक्काबुक्की प्रकरणातील चौथ्या संशयितास तीन दिवसांची पोलीस कोठडी
