मनसेच्या कार्यकर्त्यांचे गांधीगिरी स्टाईल आंदोलन

उप अभियंता व शाखा अभियंता यांच्या खुर्च्यांना पुष्पहार अर्पण करून केला निषेध व्यक्त

*💫कुडाळ दि.२४-:* कुडाळ येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालर्यात आज गुरुवारी मनसे कार्यकर्ते ठरल्याप्रमाणे उपस्थित झाले. मात्र नेहमीप्रमाणे कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने तसेच बारा वाजेपर्यंत मनसेच्या पदाधिकाºयांनी अधिकाºयांची वाट बघूनही एकही अधिकारी आला नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या मनमानी व बेजबाबदार कारभाराचा निषेध वर्तविण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी स्टाईल आंदोलन करत त्यांनी उप अभियंता व शाखा अभियंता यांच्या खुर्च्यांना पुष्पहार अर्पण करून आपला निषेध व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार व भोंगळ कारभाराविरोधात मंगळवारी कुडाळ तालुका मनसे शिष्टमंडळाने कार्यालयात अनपेक्षितपणे हजेरी लावत कार्य कर्मचाºयांची झाडाझडती घेतलेली होती. यावेळी कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले होते. त्यानंतर तालुक्यातील बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाºया सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था खड्डेमय परिस्थिती आणि वाढलेली झाडे झुडपे या संदर्भात प्रश्नांचा भडिमार केला होता. आजपर्यंत केलेल्या खर्चाचा हिशोब अधिकाºयांकडे मागितलेला होता. यासंदर्भात गुरुवारी मनसे शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता अनामिका जाधव यांनी दिले होते. त्याप्रमाणे आज गुरुवारी मनसे कार्यकर्ते सकाळी साडेदहा वाजता कार्यालयात उपस्थित झाले. मात्र नेहमीप्रमाणे कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. फक्त शिपाई दप्तर उघडून बसले होते यासंदर्भात बारा वाजेपर्यंत मनसेच्या पदाधिकाºयांनी अधिकाºयांची वाट बघूनही अधिकारी कार्यालयात उपस्थित झाले नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या या मनमानी व बेजबाबदार कारभाराचा निषेध करण्यासाठी गांधीगिरी त्यांनी उप अभियंता व शाखा अभियंता यांच्या खुर्च्यांना पुष्पहार अर्पण करून आपला निषेध व्यक्त केला. खड्डेमय परिस्थितीमुळे जनतेच्या होणाºया वेदना व मोडणारे पाठीचे कणे याबाबत तात्काळ दखल घेऊन वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे येत्या सात दिवसात सुरू न झाल्यास त्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाती घेईल, असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

You cannot copy content of this page