८ सुवर्णपदक व २ कास्यपदकाची कमाई;यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक
*💫सावंतवाडी दि.२४-:* कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले येथे घेण्यात आलेल्या युथ गेम महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशीप स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे आकीदो असोसिएशन सावंतवाडी या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन करत ८ सुवर्णपदक व २ कास्यपदकाची कमाई केली. सावंतवाडी संस्थानच्या श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. स्पर्धेत एकूण १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक व २ विद्यार्थ्यांनी कास्यपदकाची कमाई केली. यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे- योगेश कृष्णा बेळगावकर-१९ वर्षावरील-७५ किलो- खुला गट प्रथम क्रमांक, वैष्णवी आनंद रासम-१९ वर्षाखालील- ६५ किलो प्रथम क्रमांक, तेजस भालचंद्र सुर्वे- १९ वर्षावरील-५५ किलो प्रथम क्रमांक, तेजसराव महेंद्र दळवी-१७ वर्षाखालील-५० किलो प्रथम क्रमांक, प्रतिक्षा गजानन गावडे-१९ वर्षाखालील-५७ किलो प्रथम क्रमांक, ओंकार संतोष गोसावी-१७ वर्षाखालील-५५ किलो प्रथम क्रमांक, ललीत गणेश हरमलकर-१९ वर्षाखालील-८५ किलो प्रथम क्रमांक, प्रथमेश महेश कातळकर-१९ वर्षाखालील-५५ किलो खाली-द्वितीय क्रमांक, गणेश नामदेव राऊळ-१९ वर्षाखालील-३० किलो-द्वितीय क्रमांक या विद्यार्थ्याानी उज्ज्वल यश संपादन केले. सावंतवाडी संस्थानच्या श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करून सत्कार करण्यात आला. भोसले यांनी यावेळी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक सेन्सॉय दिनेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे मुख्य प्रशिक्षक सेन्सॉय वसंत जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
