कमी खर्चात शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याभर; लाभ घेण्याचे आवाहन
*💫बांदा दि.२४-:* पावसाळी शेती झाल्यानंतर हिवाळ्यात शेतकऱ्यांचा कल रब्बी पिकांकडे वळतो. शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळण्यासाठी कृषी विभागाकडून पाडलोस गावात आदर्श कडधान्य पिकांचे प्रात्यक्षिक राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाडलोसमध्ये ठराविक अंतरावर चवळीची लागवड करण्यात आली आहे. केणीवाडा येथे पाडलोस कृषी सहाय्यक श्वेता सावंत, शेतकरी विश्वनाथ नाईक, छाया नाईक, वामन केणी, प्रतिभा केणी, बंटी नाईक, साईश नाईक यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते. पाडलोस कृषी सहाय्यक श्वेता सावंत म्हणाल्या की, शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे चवळीचे मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे जास्त उत्पन्न मिळणार आहे. दोन्ही रोपांच्या मध्ये हवा पास होण्यासाठी आवश्यक जागा सोडल्याने तसेच बियाणे कमी, खत कमी लागत असल्याने याचा परिणाम थेट उत्पन्नावर होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुऴे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे आवाहन, पाडलोस कृषी सहाय्यक श्वेता सावंत यांनी केले आहे.
