⚡वेंगुर्ला ता.१२-: नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे सन 2024पासून प्रथमच जिल्हास्तरीय व्यापार क्षेत्रातील साहित्यप्रेमी पुरस्कार देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्रात व्यापार क्षेत्रात कार्यरत असणारे परंतु जे वाचनालयाच्या वाटचालीत सहभागी (साहित्याचे वाचन करणे), साहित्य निर्मिती (कथा, कादंबरी, कविता, स्फुट लेखन) करणा¬यांना यावर्षीही स्व.लक्ष्मीकांत सखाराम सौदागर स्मृती साहित्यप्रेमी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी 1 लाख रूपये कायम निधी संस्थेकडे ठेव म्हणून ठेवला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व 5 हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्रातील व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींनी आपले नाव, सभासद असलेल्या वाचनालयाचे नाव व प्रसिद्ध झाले असल्यास साहित्याची थोडक्यात माहिती, मिळालेले पुरस्कार व इतर माहितीसह प्रस्ताव नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेत कार्यालयीन वेळेत 24 डिसेंबरपर्यंत आणून द्यावेत, असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय व्यापार क्षेत्रातील साहित्यप्रेमी पुरस्कारासाठी आवाहन…
