नगरसेवक मंदार शिरसाठ ऑनफिल्ड.
⚡कुडाळ ता.१२-: शहरातील विदयुत समस्यांबाबत शिवसेना व युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भेट घेण्यात आली होती व कुडाळ शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली होती. त्याला महावितरणाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याचा भाग म्हणून गेल्या दिवसांमध्ये कुडाळ शहरांमध्ये धोकादायक पोल बदल्याणत आले तसेच सेफ्टी बॉक्स व इतर बरीच मेंटेनन्सची कामे देखील एमएसईबीच्या माध्यमातून करण्यात आली.
कुडाळ मुख्य बाजार पेठेतील काही पोल गंजल्यामुळे धोकादायक झाले होते व दुर्घटना होण्याची शक्यता होती, त्यापैकी सौभाग्य शृंगार समोरील व ग्यानु प्रसाद कॉम्प्लेक्स जवळील धोकादायक पोल आज महावितरणच्या माध्यमातून बदल्याणत आले. सदर कामामुळे व्यापारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले
सदर काम होण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ, संतोष शिरसाठ, सुशील चिंदरकर, अमित राणे, तेजू वर्दम, संदेश पडते, संदीप म्हाडेश्वर, दिनार शिरसाठ, गुरु गडकर यांनी विशेष प्रयत्न केले.
