⚡सावंतवाडी ता.१२-: आजगाव ग्रामस्थांच्या वतीने १९ ते २० डिसेंबर रोजी” दीपोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले असून,या दिवशी विविध स्पर्धा,कार्यक्रम आयोजित केले आहेत.
कार्यक्रम पुढील प्रमाणे,दिनांक १९ डिसेंबर २०२५ (संध्याकाळी ५ वाजता)पारंपारिक फुगडी स्पर्धा
(आजगाव, धाकोरे, भोमवाडी, शिरोडा, आरवली, तिरोडा, मळेवाड मर्यादित)
यांसाठी पारितोषिके प्रथम: रोख रु.२०००/- द्वितीय: रोख रु.१५००/- तृतीय: रोख रु.१०००/-
रेकॉर्ड डान्स स्पर्धा(आजगाव पंचक्रोशी मर्यादित)
(मोठा गट, वय १३ वर्षावरील)
स्पर्धक संख्या: १०
प्रथम: रोख रू.२०००/- सन्मान चिन्ह,द्वितीय: रोख रु .१५००/- सन्मान चिन्ह,तृतीय: रोख रुपये १०००/- सन्मान चिन्ह
दिनांक २० डिसेंबर २०२५ (संध्याकाळी ४ वाजता)
पाककला स्पर्धा (आजगाव मर्यादित)
या स्पर्धेचा विषय: मूग किंवा मूग डाळ पासून तिखट पदार्थ,दुधापासून गोड पदार्थ
(एक स्पर्धक दोन्ही प्रकारात भाग घेऊ शकतो)
या स्पर्धेसाठी पारितोषिके प्रथम, द्वितीय, व तृतीय (गृहपयोगी वस्तू)तसेच रेकॉर्ड डान्स स्पर्धा ठीक ६ वाजता सुरू होणार असून,
(लहान गट, वय ५–१२ वर्ष)
(आजगाव पंचक्रोशी मर्यादित)
स्पर्धक संख्या: १० असून यातील पारितोषिके प्रथम: रोख रु.२००० /-सन्मान चिन्ह,द्वितीय: रोख रु.१५००/- सन्मान चिन्ह,तृतीय: रोख रु.१०००/- सन्मान चिन्ह
वेशभूषा स्पर्धा(आजगाव पंचक्रोशी मर्यादित)
लहान गट (वय ८–१५ वर्ष), स्पर्धक संख्या १० (आजगाव पंचक्रोशी मर्यादित)प्रथम: रोख रु.२०००/- सन्मान चिन्ह,द्वितीय: रोख रु.१५००/- सन्मान चिन्ह,तृतीय: रोख रु.१०००/- सन्मान चिन्ह
मोठा गट (वय १६ वर्षावरील), स्पर्धक संख्या १० (आजगाव पंचक्रोशी मर्यादित)
प्रथम: रोख रु.२०००/- सन्मान चिन्ह
द्वितीय: रोख रु.१५००/- सन्मान चिन्ह,तृतीय: रोख रु.१०००/- सन्मान चिन्ह
विशेष आकर्षण: पैठणी स्पर्धा
यात विजेता आणि उपविजेता स्पर्धकांची निवड करण्यात येणार असून आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत.
तरी ज्या स्पर्धकांना स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी ९४२२३७९५८८ /९८२३४१८८५९ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: १८ डिसेंबर २०२५ असून सदरील स्पर्धा ही – केंद्र शाळा आजगाव नंबर १ व कै. नरहरी उर्फ बाब्या पांढरे रंगमंच, आजगाव येथे होणार आहे.
