जिल्ह्यात आज आणखी ५२३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ११ हजार ७३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५२३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

सिंधुदुर्गात…. दुसरा ऑक्सिजन प्लांट निर्माण

*मुख्यमंत्र्याच्या हस्ते ऑनलाईन द्वारे आज सायंकाळी लोकार्पण; पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा ऑक्सिजन प्लांट तयार झाला असून त्याचे लोकार्पण आज दिनांक, ७ मे रोजी सायंकाळी ०५:३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज…

Read More

तर….गोव्याकडून सिंधुदुर्गाला ऑक्सिजन पुरवठा…

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आमदार दीपक केसरकर यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०८-:* जिल्ह्यात ऑक्सिजन चा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण ऑक्सिजन पुरवठ्यासाठी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनीही आवश्यकता भासल्यास सिंधुदुर्गला ऑक्सीजन पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी झूम मीटिंग द्वारे ऑनलाईन प्रेस घेऊन दिली आहे. यावेळी…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातिल लसीकरण केंद्राबाहेर उभारला स्वखर्चातून मंडप..

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा पुढाकार 💫 *सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसह ४५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांनाही लसीकरण करण्यात येत आहे. लसीचा पहिला डोस या ठिकाणी दिला जात असून नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी स्वखर्चातून मंडप उभारत त्यांची सोय केली. यामुळे लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना…

Read More

प्रशासनाच्या धाकाला अवकाळी पावसाची साथ…

अवकाळी पावसामुळे मालवण शहर बनले सुने *💫मालवण दि०७-:* गेल्या चार दिवसांपासून सिंधुदुर्गातील काही तालुक्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला असतानाच या तड्याख्यातून सुटलेल्या मालवणला आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे मालवणचे जनजीवन विस्कळीत झाले. एकीकडे प्रशासनाने सकाळी ११ वाजल्यानंतर उघडी असणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे संकेत दिल्याने प्रशासनाचा धाक आणि त्याला…

Read More

दोडामार्ग तालुक्यात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

नवीन ६९ रुग्ण मिळाले:डॉ कर्तस्कर यांची माहिती *💫दोडामार्ग दि.०७सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून ६९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश कर्तस्कर यांनी दिली आहे. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोडामार्ग वासियांनी आज पासून सुरु करण्यात आलेल्या “जनता कर्फ्यू” ला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र गोवा सीमेवर कडक…

Read More

सावंतवाडी कॉंग्रेसने केली कोरोना रुग्णाना फळ वाटप…

*💫सावंतवाडी दि.०७-:* कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यात जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कोव्हिड सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या रुग्णाचे हाल होत होते. ही बाब कॉंग्रेस पक्षाच्या लक्षात येताच सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या वतीने आज उपजिल्हा रुग्णालय व कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना फळे व बिस्कीटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र…

Read More

मळेवाड जी प मतदार संघात जंतुनाशक फवारणी प्रारंभ…

मळेवाड-कोंडूरे सरपंच हेमंत मराठे व प्राणजीवन सहयोग संस्थेचा पुढाकार *सावंतवाडी-:* कोरोना व्हायरस या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे व प्राणजीवन सहयोग संस्था शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सॅनिटायझर फवारणी उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून दक्षता म्हणून मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात सॅनिटायझर जंतुनाशक फवारणीला सुरुवात करण्यात आली.ही फवारणी प्राणजीवन…

Read More

शिरोडा परिसरात सकाळी गडगडाटासह अवकाळी पाऊस

*💫वेंगुर्ले दि.०७-:* वेंगुर्ले तालुक्यात आज शुक्रवारी शिरोडा गावा सह काही गावांमध्ये सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट करत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तालुक्यात सध्या उष्णतेचे प्रमाण अधिकच वाढले आहे. मात्र अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने वातावरणात थोडासा गारवा निर्माण केला. एन मे महिन्यात अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे अनेकांची मात्र दमछाक…

Read More

मायनिंग व्यवसायामुळे कोरोना पसरत नाही का ?

मनसेच्या सुधीर राऊळ यांचा प्रश्न; जनता कर्फ्यूत मायनिंग राजरोस सुरु *💫सावंतवाडी दि.०७-:* तालुक्यात संचारबंदी आणि जनता कर्फ्यु सुरू असताना राजरोसपणे मोठ्या प्रमाणात मायनिग सुरू आहे. त्यामुळे कोरोना पसरत नाही का ? असा सवाल मनसे तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे म्हटले आहे की मायनिंग वर…

Read More
You cannot copy content of this page