*💫सावंतवाडी दि.२५-:* मळगाव ब्राम्हणपाट जोशी-मांजरेकरवाडी येथील जागृत देवस्थान श्री देव महापुरूष देवाचा वार्षिक जत्रोत्सव ३ जानेवारी रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून हा जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर रात्री खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी शासनाचे नियम पाळून जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या मानकऱ्यांनी केले आहे.
मळगाव-ब्राम्हणपाट येथील महापुरूष देवाचा वार्षिक जत्रोत्सव ३ जानेवारी रोजी
