रात्री एकची घटना: सावंतवाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू..
⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे धोकादायक वळणावर चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक देऊन चालकाने पलायन केल्याची घटना काल रात्री एकच्या सुमारास घडली. या अपघातात कोलगाव येथील दोघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीस्वार हे रात्री एकच्या सुमारास माजगाव येथून कोलगावकडे आपल्या घरी जात होते. माजगाव येथील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर चारचाकी चालकाने घटनास्थळावरून तात्काळ पलायन केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. फरार वाहनचालकाचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान यात दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे.
