सांगली येथील शैक्षणिक सहलीच्या खाजगी आराम बसला कारची समोरासमोर धडक…

जामसंडे आझादनगर येथील धोकादायक वळणावरिल घटना:कार मधील एका प्रवाशाच्या उजव्या डोळ्याला दुखापत..

⚡देवगड ता.१२-:
जामसंडे आझाद नगर येथील धोकादायक वळणावर शैक्षणिक सहलीची खाजगी आराम बस व कार यांमध्ये समोरासमोर अपघात
या अपघातात कार मधील एक जण जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला.
उपलब्ध माहितीनुसार, सांगली तासगाव येथील वसंतदादा पाटील ज्युनिअर कॉलेजची शैक्षणिक सहल आज सकाळी सांगलीहून
MH १० AW ५४५४ या खाजगीवर आराम बसने मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी आले होते. सिंधुदुर्ग किल्ला पाहिल्यानंतर कुणकेश्वर येथून विजयदुर्ग किल्ला येथे जात असताना जामसंडे विजयदुर्ग महामार्गावर आझादनगर येथील धोकादायक वळणावर विजयदुर्ग होऊन देवगडच्या दिशेने येणाऱ्या MH १० BM ७११० (आय टेन) चारचाकीची समोरून धडक खाजगी आराम बसच्या ड्रायव्हरच्या बाजूने बसली. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात चालक युवराज अडसुळे (४१)रा कोल्हापूर यांच्या बाजूला बसलेल्या सागर भाऊ वटारकर (४५) रा पाचगाव कोल्हापूर यांच्या उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला दुखापत झाली असून त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्यांच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला तीन टाके पडले. कारमध्ये कोल्हापूर येथील एकूण तिघे असून ते व्यवसायाच्या कामासाठी विजयदुर्ग परिसरातील काम आटपून देवगडला येत होते. सांगली तासगावहून मालवण , कुणकेश्वर , विजयदुर्ग येथे जात असलेल्या शैक्षणिक सहलीच्या खाजगी आराम मध्ये जूनियर कॉलेजची ४५ मुले व चार शिक्षक होते. मात्र यामधील काही विद्यार्थांना किरकोळ दुखापत झालेली आहे.
अपघाताची माहिती मिळतात देवगड पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस प्रवीण सावंत, प्रसाद आचरेकर हे घटनास्थळी दाखल झाले.स्थानिक ग्रामस्थ व कट्टा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय शेडगे यांच्या मदत कार्याने रस्ता वाहतुकीस खुला केला. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत देवगड पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती.

You cannot copy content of this page