*💫सावंतवाडी दि.२५-:* वेत्ये व इन्सुली भागात सध्या मोठा प्रमात क्वारी उत्खनन सुरू असून यात आजूबाजूच्या घराना तडे गेले असून तसेच हे कौरी मालक परप्रांतीय असून ते लोक स्थानिक नागरिकांवर दादागिरी करत आहेत. ही दादागिरी खपवून घेणार नाही . असा इशारा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी नगरसेवक सुधिर आडीवरेकर,नगरसेवक आनंद नेवगी,नगरसेवक मनोज नाईक, परिक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते
यावेळी ते पुढे म्हणाले की, या क्वारी बेकायदेशीर रित्या उत्खनन करत असून, तहसीलदार व प्रताधिकार यांचे यावर लक्ष नसून या बेकायदेशीर उत्खननाचे मोजमाप नसून त्यांच्यावर दंड देखील करण्यात आला नाही आहे. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांचे हे वागणे बेजबाबदार असून, या क्वारीचा तपशील आपण मागवणार असून, याबाबतचा अहवाल न दिल्यास प्रात कचेरीवर जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार असल्याचा इशारा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी दिला आहे.
