*💫सावंतवाडी दि.१४-:* महाविकास आघाडीच सरकार हे राज्यात पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टिका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. बेकायदेशीर व्यवसाय करणारे व्यवसायिक आणि अधिकारी यांचे साटेलोटे असल्यानेच अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. सावंतवाडी तालुक्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक विकास कामांची भूमिपूजन करण्यात आली होती. सावंतवाडी मल्टि स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे दोन वेळा भूमिपूजन करण्यात आले तरी देखील त्याचा निर्णय झाला नाही. यावेळी या ग्रामपंचायतीत ७० ही ग्रामपंचायत वर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील ७० ही ग्रामपंचायत वर भाजपचा झेंडा फडकवणार
