आरवली किनारी मिळालेला तो मृतदेह देवगड बंदरातील बेपत्ता खलाशाचा
*ð«वेंगुर्ले दि.२९-:* वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह देवगड बंदरात बुडालेल्या बोटीवरील खलाशी प्रकाश काशीराम बिरिद (वय 40 ) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या मृतदेहावर सागर तीर्थ येथे आज सकाळी बिरीद कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आरवली – सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवार 28 मे रोजी सकाळी…
