Headlines

पहिल्या डोस देऊन ४५ दिवस होऊन गेलेल्या नागरिकांना दुसरा डोस कधी मिळणार…?

आरोग्य प्रशासनाचे नाही नियोजन; ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांनी उपस्थित केला प्रश्न*

सावंतवाडी-: जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील ६० ते ८० वयोगटातील पत्रकारांना व अन्य नागरिकांना डोस देतेवेळी २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु नंतर त्याची मुदत ४५ दिवसांनी तर पुन्हा एकदा मुदत वाढ करत ८५ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. पहिला डोसची प्रतिकारशक्ती नक्की किती दिवस आहे असा सवाल ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा उर्फ वसंत केसरकर यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात दुसरा डोस वेळेत दिला जात नसून, लसीचा पुरवठा योग्य प्रकारे होत नसून, त्याची माहिती जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी घ्यावी अशी मागणी देखील त्यानी यावेळी केली आहे. सावंतवाडीतील १५ पत्रकारांना पहिला डोस घेऊन ४८ दिवस उलटून गेले तरी दुसरा डोस कधी दिला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून दिली जात नसल्याची तक्रार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी अशा प्रकारे फक्त मुदतवाढ देऊन कोरोनाची लागण रोखता येईल का असा प्रश्न अण्णा केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page