जिल्ह्यात आज आणखी ३०२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३८ हजार ३९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ५९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३०२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

उभी करून ठेवलेली दुचाकी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

*💫दोडामार्ग दि.०७सुमित दळवी-:* दोडामार्ग शहरात उभी करून ठेवण्यात आलेल्या दुचाकीला शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा प्रकार आज सकाळी दोडामार्ग शहरात घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अधिक माहिती अशी की संबंधित दुचाकी ही त्या परिसरातील एका युवकाने त्याठिकाणी उभी करून ठेवली होती. त्या…

Read More

नेमळे सहकारी कौल उत्पादक संस्था उर्जितावस्थेत आणणार

कारखान्याच्या पुनर्बांधणीसाठी १ कोटी भांडवलाची आवश्यकता:आत्माराम राऊळ *सावंतवाडी :* नेमळे सहकारी कौल उत्पादक संस्थेला आधुनिकतेची जोड देत उर्जितावस्था आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मत कौल कारखान्याचे अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. १०० कुटुंबांचा चरितार्थ चालणाऱ्या कारखान्याची पुनर्बांधणी करण्यासाठी १ कोटी भांडवलाची आवश्यकता असल्याचे कौल कारखान्याचे अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी पत्रकार परिषदेत…

Read More

बंद काजू कारखान्यात आढळलेल्या अजगराच्या 9 पिल्लांना मिळाले जीवदान

मदतीसाठी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु टीम सरसावली *💫वेंगुर्ला दि.०७-:* तालुक्यातील आडेली भटवाडी येथील दिलीप गावडे यांना बंद काजुच्या कारखान्यात दिसून आलेल्या अजगराची नऊ पिल्लांना कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम सिंधुदूर्गच्या टीमने पकडले. आणि वनरक्षकांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडून या पिल्लांना जीवदान दिले. आडेली येथील दिलीप गावडे आसरा घेण्यासाठी त्या काजू कारखान्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी…

Read More

मळेवाड गावातील दशावतारी कलाकारांना धान्य वाटप

सरपंच हेमंत मराठे यांचा स्तुत्य उपक्रम *💫सावंतवाडी ता.०७-;* सरपंच हेमंत मराठे यांच्याकडून गावातील दशावतारी कलावंतांना धान्य वाटप करण्यात आले.गेल्या वर्षीपासून कोरोना महामारी मुळे दशावतारी नाट्यप्रयोग पूर्णपणे बंद झाल्याने या दशावतार कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. सेवाभावी संस्था, राजकीय नेते, दानशूर व्यक्ती यांनी आपापल्या परीने या दशावतार कलावंतांना मदतीचा हात पुढे केला. मळेवाड कोंडुरे गावातील व्यावसायिक…

Read More

*अखेर ‘त्या ‘ वनपालाची बदली

*सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांच्या मागणीला यश *💫सावंतवाडी दि.०७-:* माणगाव येथील वनपालाची बदलीपास घोटाळा प्रकरणी अखेर कुडाळ येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात बदली करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी येथील सावंतवाडी वनविभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडत या घोटाळा प्रकरणी त्याचाकडील पदभार काढून घेण्याची मागणी केली होती. या बदलीने त्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे….

Read More

खारेपाटण गटविकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी विजय देसाई

*💫कणकवली दि.०७-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसा. लिमिटेड या शेतकरी सहकारी संस्थेच्या रिक्त झालेल्या चेअरमनपदच्या पोटनिवडणुकीत संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक विजय जयराम देसाई यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन प्रमोद विश्वनाथ निग्रे…

Read More

कणकवली रोटरी क्लबच्या नूतन कार्यकारिणीचा ११ जुलै रोजी पदग्रहण सोहळा होणार

*💫कणकवली दि.०७-:* रोटरी क्लब कणकवली सेन्ट्रलचे सन २०२१-२२ साठी नूतन प्रेसिडेंट म्हणून जिल्ह्यातील प्रथितयश व्यक्तिमत्व आणि संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर तायशेटे यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लबच्या इतर पदांवर रो. शंकर (रवी) परब यांची उपाध्यक्षपदी, रो. वर्षा बांदेकर यांची सेक्रेटरीपदी, रो. ॲड. राजेंद्र रावराणे यांची एक्झिक्युटीव्ह सेक्रेटरीपदी आणि रो. रविंद्र मुसळे यांची ट्रेझररपदी निवड…

Read More

नवी मुंबई येथील विमानतळाला कोकणचे सुपुत्र लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे

स्वतंत्र कोकण संघर्ष समितीची मागणी . *💫कणकवली दि.०७-:* स्थानिक पातळीबरोबरच राज्य व राष्ट्रीय पातळीवर गोरगरिबांचे अश्रू पुसून उत्कृष्ट , शैक्षणिक , सामाजिक व राजकीय कार्य करणारे लोकनेते माजी खासदार कोकणचे सुपुत्र आदरणीय स्व .दि.बा. पाटील यांचे नाव पनवेल येथे उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास द्यावे असे स्वतंत्र कोकणचे प्रणेते प्रा . महेंद्र नाटेकर यांनी राज्य सरकार…

Read More

कणकवली -बांधकरवाडी येथील दिनकर राणे यांचे निधन

*💫कणकवली दि.०७-:* बांधकरवाडी येथील रहिवासी दिनकर भास्कर राणे (७३) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.कणकवली बाजारपेठेतील उचले किरणा दुकान येथे ते कामाला होते.आयुर्वेदिक औषधउपचार कशा प्रकारे घ्यावयाचा याची इतंबूत माहिती त्यांना होती.ह्समुखत व विनोदी स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते.यासोबतच बांधकारवाडी येथील धार्मिक व सामाजिक उपक्रमात त्याचा नेहमी सहभाग होता.त्यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त…

Read More
You cannot copy content of this page