*💫कणकवली दि.०७-:* रोटरी क्लब कणकवली सेन्ट्रलचे सन २०२१-२२ साठी नूतन प्रेसिडेंट म्हणून जिल्ह्यातील प्रथितयश व्यक्तिमत्व आणि संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर तायशेटे यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लबच्या इतर पदांवर रो. शंकर (रवी) परब यांची उपाध्यक्षपदी, रो. वर्षा बांदेकर यांची सेक्रेटरीपदी, रो. ॲड. राजेंद्र रावराणे यांची एक्झिक्युटीव्ह सेक्रेटरीपदी आणि रो. रविंद्र मुसळे यांची ट्रेझररपदी निवड करण्यात आली आहे. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ रविवार ११ जुलै २०२१ रोजी आयोजित करण्यात आला असून या समारंभात डीस्ट्रीकट गव्हर्नर रो. व्यंकटेश उर्फ बबन देशपांडे हे मार्गदर्शन करणार आहेत. पदग्रहण समारंभ असिस्टंट गव्हर्नर रो. शशिकांत चव्हाण आणि रो. राजेश घाटवळ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सध्याची कोविड काळाची परिस्थिती विचारात घेऊन पदग्रहण समारंभ हा ऑनलाईन संपन्न होणार असून या सोहळ्यास रोटरी सदस्य आणि अन्य शुभेच्छुकांनी ऑनलाईन उपस्थिती ठेवावी, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
कणकवली रोटरी क्लबच्या नूतन कार्यकारिणीचा ११ जुलै रोजी पदग्रहण सोहळा होणार
